Maayboli Page

पाउस  असा रुणझुणता  ....!


या नाभाने या भुईला दान द्यावे
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतीतुनी चैतन्याने गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला कि...
जोन्धाल्याला चांदणे लाखाडून यावे
या नभाने या भुईला दान द्यावे.....
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे
या नभाने या भुईला दान द्यावे...
गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी हि झोपडी काळीज माझे
मी असा आनंदाने बेहोष होता...
शब्द गंधे तू मला बाहूत ग्यावे ते म्हणू देत्यांच्या दुःखाच्या पावसामधे त्यांचं त्यांना कण्हू दे

पाउस असा रुणझुनता पैन्जाने सखिची स्मरली...
पाऊल भिजत जातांना चाहुल विरत गेलेली ....

काही मनाच्या कोवळ्या काचेवरी...
वाजते काही मनाच्या कोवळ्या काचेवरी...
आणि मनाच्या पाळण्यात रंगतो पाउसही....
पाऊस पडतो तेंव्हाएकच काम करायचं ....
हातातली कामं टाकुन देउनपावसात जाऊन भिजायचं !
पहिला
स्क्रू ढिला झालाअसं सुध्दा म्हणतीलहसायचं त्यांना हसू देकाय म्हणायचं

पाऊस पडत असतांना, तो मातीचा सुगंध
आणि गार गार वारा
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरासनार्‍या धारा!

नेहमी उत्तरे द्यावी लागतात
वेड्या सारखे वागल्यावर
पण वेड्या सारखे होते
पाऊस पडायला लागल्यावर


***************

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्याकोसळणार् या धारा
श्वासान्मध्ये भरून घ्यायचासळाळणारा वारा
कानांमधे साठवुन घ्यायचे गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायचीसौदामिनीची रेघ
पावसाबरोबर पाऊस बनूननाच नाच नाचायचं
अंगणामधे , मोगर् यापाशीतळं होऊन साचायचं !
आपलं असलं वागणं बघुनलोक आपल्याला
असल्या चिल्लर गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस एकदाच येतो हे आपण लक्षात ठेवायचं !
म्हणून ..पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउनपावसात जाऊन भिजायचं !

********************
मृद्गंध असू दे किव्वा असू दे पावसाची सर
पावसाळ्याची चाहूल हि मनात करते घर
चिंब भिजलेली झाडे आणि पक्ष्यांचे पर
पावसात भिजण्याच्या आनंदाला नाही कशाचीही सर
वाफाळलेले कणीस आणि गरमागरम चहाचा स्वाद
सिंहगडावर घेऊ पावसाचा आस्वाद
ढगांचा गडगडाट आणि विजेचा लख लखाट
पाउस येताच प्रियकर प्रेयसीच्या बंधनात
पावसानंतर खळाळनारे ओढ्यातील पाणी
सखीच्या मिठीत प्रीतीची गाणी
येक दिवस उजवतो ढग जातात निवळून
मनात वाटत रहाते ....
आभाळाने परत घ्यावे ढगांना कवळून ....!

********************
मेघ हे सारे मला फसवून का गेले?
थेंब अश्रूंचे भिजवून का गेले
या ढगांची रित मला कधी समजलीच नाही
बरसायचं नव्हतं तर आकाश सजवुन का गेले ????
********************




No comments:

Post a Comment